Mann Ki Baat : या वर्षातील आज अखेरचे ‘मन की बात’; पंतप्रधान नेमकं काय बोलणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.26) सकाळी 11 वाजता मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या वर्षातील हे अखेरचे ‘मन की बात’ असणार आहे, त्यामुळे पंतप्रधान मोदी नेमकं काय बोलणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलं आहे. 

लहान मुलांच्या लसीकरणाबाबत नुकतीच महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. शिवाय बुस्टर डोस, ओमिक्रोनच्या वाढत्या केसेस लक्षात घेत त्यासाठी जारी करण्यात आलेली नवी नियमावली अशा अनेक गोष्टींबाबत नेमकं काय बोलणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

आजच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा हा 84 वा भाग आहे. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता आकाशवाणी आणि डीडी चॅनलवर मन की बात प्रसारित होेतं, शिवाय प्रसार भारती आपल्या विविध डीडी चॅनल्सवर या कार्यक्रमाच्या व्हिज्युअल आवृत्त्या हिंदी आणि इतर भाषांमध्येही प्रसारित केल्या जातात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.