PM Modi Warned China: विस्तारवादाचे युग आता संपलंय – पंतप्रधान मोदी

भारतीय सैनिकांचे मनोधैर्य आणि साहस हे हिमालयाएवढं उंच आहे. भारतीय जवानांनी जगाला आपल्या शौर्याचा नमुना दाखवून दिला आहे, या शब्दांत त्यांनी भारतीय सैनिकांच्या पराक्रमाचे कौतुक केले.  

एमपीसी न्यूज – विस्तारवादाचा काळ मागे सरला आहे, आता विकासवादाचा काळ आहे, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमध्ये कुरापती काढणाऱ्या चीनला आज (शुक्रवारी) खडेबोल सुनावले. भारतीय सैनिकांचे मनोधैर्य आणि साहस हे हिमालयाएवढं उंच आहे. भारतीय जवानांनी जगाला आपल्या शौर्याचा नमुना दाखवून दिला आहे, या शब्दांत त्यांनी भारतीय सैनिकांच्या पराक्रमाचे कौतुक केले.  

भारतीय सैनिकांचे मनोधैर्य भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी पंतप्रधान लेह लडाखमध्ये दाखल झाले.  आपल्या लेह दौऱ्यात निमूमध्ये भारतीय जवानांना संबोधित केले. आपल्या भाषणात मोदी यांनी एकीकडे भारतीय सैनिकांचे मनोधैर्य आणि उत्साह वाढवला, तर दुसरीकडे चीनलाही खडेबोल सुनावले.

मोदी म्हणाले की, “विस्तारवादाचा काळ संपला असून आता विकासवादाचा काळ आहे. वेगाने बदलत्या काळात विकासवादच गरजेचा आहे. मागील शतकात विस्तारवादानेच मनुष्यजातीचा विनाश केला. एखादा जर विस्तारवादाच्या हट्टाने पेटला तर हा विश्वाच्या शांततेसाठी धोका आहे. इतिहास साक्षीदार आहे की, अशी ताकद कायमच मिटून जाते.”

चीन कायमच लडाख, अरुणाचल प्रदेशातील काही परिसरावर आपला दावा सांगत असतो. इतकंच नाही तर रशिया आणि भूतानच्या काही क्षेत्रावरही चीनने आपला दावा सांगितला आहे.

“जेव्हा मी देशाच्या सुरक्षेसंबंधी निर्णयांबाबत विचार करतो तेव्हा सर्वात आधी दोन माता माझ्या नजरेसमोर असतात. एक माता म्हणजे आपली भारत माता आणि दुसरी म्हणजे वीरमाता ज्यांनी सैनिकांना जन्म दिला आहे,” असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. तसंच जवानांना सुरक्षा उपकरणे आणि शस्त्र पुरवण्याबाबत सरकार सर्वप्रकारे मदत करत असल्याचे मोदी म्हणाले.

आपल्या संबोधनात पतंप्रधान मोदी यांनी जवानांचा उत्साह वाढवला. ते म्हणाले की, तुमचे हात डोंगरांसारखे मजबूत आहे. तुमची इच्छाशक्ती या पर्वत रांगांपेक्षा दृढ आहे. शत्रूंनी जवानांचा उत्साह आणि राग पाहिला आहे. देशाची सुरक्षा तुमच्या हातात आहे, तुमच्या मजबूत इराद्यांमध्ये आहे तर केवळ मलाच नाही तर संपूर्ण देशाला अतुट विश्वास आहे आणि देश निश्चिंत आहे. तुमचं मनोधैर्य, शौर्य आणि भारतमातेच्या संरक्षणासाठी समर्पण अतुलनीय आहे. ज्या कठीण परिस्थितीमध्ये, ज्या उंचीवर तुम्ही भारतमातेची ढाल बनून तिचं रक्षण करत आहात, सेवा करत आहात, त्याची तुलना जगात कुठेही होऊ शकत नाही.”

_MPC_DIR_MPU_II

पंतप्रधान मोदी यांचा अचानक लेह दौरा

भारत आणि चीन सीमेवर तणाव सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं सरप्राईज दिलं. सूर्योदय होण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अचानक लेहमध्ये पोहोचले. भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी पंतप्रधान लेह लडाखमध्ये दाखल झाले. विशेष म्हणजे मोदींच्या या दौऱ्याची अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. पंतप्रधान मोदींसोबत चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत आणि लष्करप्रमुख एम एम नरवणे हे देखील उपस्थित आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • देशाची सुरक्षा तुमच्या हातात आहे, तुमच्या मजबूत इराद्यांमध्ये आहे तर केवळ मलाच नाही तर संपूर्ण देशाला अतुट विश्वास आहे आणि देश निश्चिंत आहे.
  • तुम्ही तैनात असलेल्या उंच ठिकाणाापेक्षा तुमचं शौर्य उंच आहे. तुमचा निश्चय गलवान खोऱ्यापेक्षाही बळकट आहे
  • तुमचे हात तुमच्या आजूबाजूला असलेल्या डोंगरांसारखे बळकट आणि मजबूत आहेत. तुमची इच्छाशक्ती या पर्वत रांगांपेक्षा दृढ आहे.
  • तुमचं मनोधैर्य, शौर्य आणि भारतमातेच्या संरक्षणासाठी समर्पण अतुलनीय आहे. ज्या कठीण परिस्थितीमध्ये, ज्या उंचीवर तुम्ही भारतमातेची ढाल बनून तिचं रक्षण करत आहात, सेवा करत आहात, त्याची तुलना जगात कुठेही होऊ शकत नाही.
  • 14 कोरच्या शौर्याच्या किस्से जगजाहीर आहेत. जगाने साहस पाहिलं आहे. तुमच्या शौर्याची गाथा घराघरात सांगितली जाते. भारताच्या शत्रुंनी तुमच्यातली आग पाहिलीय.
  • आज प्रत्येक भारतीय तुमच्यासमोर म्हणजेच देशाच्या वीर सैनिकांसमोर नतमस्तक होत आहे. आज प्रत्येक भारतीय छाती तुमच्या शौर्य आणि पराक्रमाने फुलून आली आहे.
  • मी गलवान खोऱ्यात शहीद जवानांना पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेहमध्ये जवानांसमोर केलेले संपूर्ण भाषण पाहा….

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.