PM Modi Will Address The Nation: पीएम मोदी आज 4 वाजता देशाला संबोधित करणार, मोठ्या घोषणेची शक्यता

PM Modi will address the nation: PM Modi will address the nation today at 4 pm, the possibility of a big announcement

एमपीसी न्यूज- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (दि.30) सायंकाळी 4 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ते कोणत्या मुद्द्यावर बोलणार आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, कोरोना विषाणूच्या संकटावर ते बोलू शकतात असे मानले जात आहे. त्याचबरोबर भारत आणि चीन यांच्यातील तणावावरही पंतप्रधान बोलतील असा अंदाज लावला जात आहे.

पीएमओ इंडियाच्या टि्वटर हँडलवरुन याची माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी हे सायंकाळी 4 वाजता देशाला संबोधित करणार असल्याचे टि्वटमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करण्यापूर्वी केंद्र सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी सोमवारी 59 चिनी अ‍ॅप्सवर भारतात बंदी घातली आहे. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राऊजरसारख्या मोठ्या चायनीज ऍपचा समावेश आहे. त्यांच्यावर आयटी अ‍ॅक्ट 2000 नुसार बंदी घातली आहे.


त्याचबरोबर आज भारत आणि चीन दरम्यान कमांडर पातळीवरील चर्चेचा तिसरा टप्पा आहे. सकाळी 10.30 पासून ही बैठक सुरु होईल. यामध्ये दोन्ही देश एलएसीवरील तणाव कमी करण्याबाबत चर्चा करु शकतात.

हिंद महासागरमध्ये भारताने आपली पाळत वाढवल्याचे वृत्त येत आहे. या माध्यमातून भारत आपल्या सीमेबाबत सतर्क असल्याचा संदेश दिला जात असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, कोरोना संकटकाळात पंतप्रधान मोदींनी देशाला अनेकवेळा मार्गदर्शन केले आहे. यापूर्वी त्यांनी सर्वांत आधी 19 मार्च रोजी देशात 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. त्यानंतर 24 मार्चला देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.