Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी पुण्यात भेट

एमपीसी न्यूज – राज्यात काँगेस – राष्ट्रवादी – शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रथमच नवनियुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात शुक्रवारी भेट होणार आहे.

नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्यात पोलीस महासंचालकांच्या परिषदेसाठी येत आहेत. त्यांचा दोन दिवस शहरात मुक्काम असेल. या परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार असल्याचे समजते. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.