Pm Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सिरम’मध्ये आगमन

एमपीसी न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्याच्या सिरम इन्स्टिटयूटमध्ये आगमन झाले. आज, शनिवारी कोरोना लशीची निर्मिती सुरु असलेल्या अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे तीन प्रकल्पांना पंतप्रधान भेट देत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सायंकाळी 4.30 च्या सुमारास वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या हॅलीपॅडवर आगमन झाले.

पंतप्रधान मोदी पुण्यातील मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये येऊन कोविशिल्ड प्रकल्पाचा आढावा घेतला. अदर पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आतापर्यंत 4 कोटी डोसची निर्मिती झाली आहे. मानवी चाचणीचा तिसरा टप्पा सुरू आहे. सिरम इन्स्टीट्यूटने ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकासोबत करार केला आहे.

भारतात ‘कोविशिल्ड’ असे ऑक्सफर्डने विकसित केलेल्या या लशीचे नाव आहे. ऑक्सफर्डने तयार केलेली ही लस 70 टक्के परिणामकारक आहे.

दरम्यान, आज अहमदाबादच्या झायडस बायोटेक पार्कचा दौरा करुन, स्वदेशी DNA आधारीत लशीबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. करोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या टीमचे मोदींनी कौतुक केले. या प्रवासात भारत सरकार त्यांच्यासोबत मिळून काम करत आहे, असे मोदींनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

मोदींनी लस निर्मितीचे काम समजून घेताना झायडसच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकही केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.