Pm Narendra Modi News : मोदींच्या स्वागताला राज्यपाल,मुख्यमंत्री राहणार अनुपस्थित !

एमपीसी न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (दि. 28) पुणे दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यापैकी कोणीही उपस्थित राहणार नाहीत. कारण त्याबाबतच्या सूचना पंतप्रधान कार्यालयातून दिल्या आहेत.

कोरोना काळात अल्पकालीन पुणे दौरा असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी कोणीही उपस्थित राहू नये, असा निरोप प्रशासनाला मिळाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

राजशिष्टाचार नियमावलीनुसार पंतप्रधान संबंधित राज्याच्या दौऱ्यावर असताना त्या राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री त्यांचे स्वागत करत असतात.

परंतु यंदा प्रथमच कोणीही उपस्थित राहू नये, अशा स्पष्ट सूचना ‘पीएमओ’कडून केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पीएम मोदी यांच्या स्वागतास राज्यपाल कोश्यारी आणि मुख्यमंत्री ठाकरे उपस्थित राहणार नाहीत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.