Pm Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला कोविशिल्ड लशीचा आढावा

एमपीसी न्यूज : कोरोना महामारीवर प्रभावीपणे मात करू शकणारी कोविशिल्ड लशीच्या संशोधन, निर्मिती आणि वितरणाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये आढावा घेतला.

पंतप्रधानांनी कोविड-19 विषाणू प्रतिबंधात्मक कोव्हिशिल्ड लस विकास, उत्पादन, वितरण, साठवण आणि व्यवस्थापन प्रक्रियेची माहिती घेतली.

यावेळी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. सायरस पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला, कार्यकारी संचालक नताशा पुनावाला, शास्त्रज्ञ तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी अदर पुनावाला यांनी संस्थेची माहिती दिली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेतील कोविड -19 प्रतिबंधात्मक लस निर्मितीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांना लस देण्याच्या प्रयत्नांची पूर्वतयारी, आव्हाने आणि नियोजन यांची माहिती शास्त्रज्ञांनी दिली.

या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटद्वारे म्हणाले, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे संघाशी चांगला संवाद झाला. त्यांनी लस उत्पादन वाढीसाठी कशी योजना आखली आहे याविषयी त्यांनी आतापर्यंतच्या प्रगतीबद्दल तपशील उघड केला. तसेच त्यांच्या उत्पादन सुविधेचा आढावा घेतला.

पत्रकारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधताना मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला म्हणाले, कोव्हिशिल्ड लशीच्या प्रगतीवर पंतप्रधान मोदी यांनी आज आनंद आणि समाधान व्यक्त केले आहे.

ही लस घेतल्यास 60 टक्क्यापर्यंत फरक पडतो, त्यामुळे रुग्णालयांमध्ये जेणे गरजेचे नाही. आणखी काही चाचण्या यशस्वी झाल्यानंतर येत्या काही दिवसांमध्ये ही लस भारतीयांसाठी बाजारपेठेत आणली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.