Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘दगडूशेठ ट्रस्ट’च्या व्हर्च्युअल माध्यम सुविधेचे कौतुक

एमपीसी न्यूज – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर केलेल्या ऑनलाईन माध्यमांच्या सुविधांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.

यंदा ट्रस्टने ‘ऑगमेंटेड रिअॅलिटी’ या तंत्रज्ञानाद्वारे देखील गणेशभक्तांना घरबसल्या आरतीची सुविधा करून दिली आहे. त्यामुळे अशा सर्वच ऑनलाईन सुविधांचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून शुभेच्छा संदेशाचे पत्र ट्रस्टला पाठवले आहे. गणेशभक्तांना घर बसल्या व्हर्च्युअल माध्यमांद्वारे गणेशाचे दर्शन व आरतीची सुविधा करुन दिल्याबद्दल मोदी यांनी कौतुक केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.