New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी राष्ट्राला संबोधित करणार

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी देशभर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनची मुदत उद्या ( मंगळवारी) संपणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 10  वाजता देशातील जनतेसोबत संवाद साधणार आहेत.

भारतात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्यानंतर या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी 22  मार्चपासून देशभर लॉकडाऊन लागू केला. तसेच या लॉकडाऊनची देशभरात कडक अंमलबजावणीही झाली. 21  दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये देशभरातील नागरिक घरीच बसून राहिले. अत्यावशक सेवा वगळता अन्य सर्व व्यवहार ठप्प झाले.

आता या लॉकडाऊनची मुदत उद्या ( मंगळवारी) संपणार आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी उद्या सकाळी राष्ट्राला संबोधित करणार आहेत. या वेळी ते लॉकडाऊनमध्ये वाढ करतात का? , तसेच नवी कोणती घोषणा करतात, या कडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.