PM Narendra Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा, वाॅशिंग्टन विमानतळावर जंगी स्वागत

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसीय अमेरिका दौरा आयोजित करण्यात आला आहे. त्यानुसार भारतीय वेळेप्रमाणे मध्यरात्री पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या वाॅशिंग्टन डलेस आंतरराष्टीय विमानतळावर दाखल झाले. दरम्यान, विमानतळावर मोदींचे जंगी स्वागत करण्यात आले. 

तीन दिवसीय आयोजित कार्यक्रमांसाठी पंतप्रधान मोदी आता थेट पेंसिलवेनिया एवेन्यू येथील हॉटेल विलार्ड इंटरकॉन्टिनेंटलसाठी रवाना होणार असून अमेरिका दौऱ्यादरम्यान मोदी याच हॉटेलमध्ये राहणार आहेत.

23 सप्टेंबर रोजी अमेरिकेतील वेळेनुसार सकाळी 9.40 वाजता (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:15 वाजता), ठरलेल्या भेटीगाठी होणार आहेत. या भेटीमध्ये क्वॉलकॉमचे अध्यक्ष आणि CEO, अॅडॉबचे चेअरमन, फर्स्ट सोलरचे CEO, जनरल अॅटॉमिक्सचे चेअरमन आणि CEO आणि ब्लॅकस्टोनचे संस्थापक यांचा सहभाग असेल.

या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट घेणार आहेत, सोबतच क्वाड लीडर्स मीट आणि यूएनजीएसोबत पहिली बैठक देखील घेणार आहेत. या दौऱ्यासाठी पंतप्रधान मोदींसोबत परराष्ट्र मंत्री, एनएसएसह एक उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा समावेश असून हा दौरा नेमका कसा असेल याची माहिती परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.