PM Narendra Modi : काय असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा संदेश…?
एमपीसी न्यूज – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी जनतेशी संवाद साधत जनतेला संदेश देणार आहेत. याविषयी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माहिती देण्यात आली आहे.
‘आज संध्याकाळी 6 वाजता राष्ट्राला संदेश देणार आहे. आपण जरूर सहभागी व्हावं’असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं आहे. कोरोना महामारी आणि देशातील सद्यस्थितीचा विचार करता आज पंतप्रधान मोदी काय संदेश देतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आज शाम 6 बजे राष्ट्र के नाम संदेश दूंगा। आप जरूर जुड़ें।
Will be sharing a message with my fellow citizens at 6 PM this evening.
— Narendra Modi (@narendramodi) October 20, 2020
महाराष्ट्रासह अनेक भागात परतीच्या पावसाने कहरच केला आहे, त्यामुळे शेतीसह इतर व्यवसायांवरही परिणाम झालेला आहे. तसेच कोरोना संकटही आहेच, देशातील संशोधक वैज्ञानिक देखील या रोगावरील लसीसाठी प्रयत्नशील असून भारत लस बनवण्यात लवकरच यशस्वी होईल, असं प्रतिपादन त्यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या संबोधनात केले होते.
देशाची आर्थिक परिस्थिती बिकट असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रातर्फे खास पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे, मोदी याबद्दल काही विस्तृत माहिती देतील याबाबत देखील शक्यता वर्तवली जात आहे.
देशातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असल्याने पंतप्रधान त्याबद्दल बोलतील की सण-उत्सवांचा काळ असल्याने नागरिकांना काही आवाहन करतील, असे अनेक प्रश्न देशवासीयांना पडले आहेत.