
PMC 3rd Round of Vaccination : तिसऱ्या फेरीत 600 पैकी 360 जणांचे लसीकरण

एमपीसी न्यूज : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची देशव्यापी मोहीम सुरु आहे. याच्या पहिल्या टप्प्यातील तिसऱ्या फेरीत शुक्रवारी पुण्यातील 600 पैकी 360 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोव्हिशिल्ड लस देण्यात आली.


पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात 55, येरवडा राजीव गांधी रुग्णालय 51, कोथरूडमधील जयाबाई सुतार हॉस्पिटल 96 , बी.जे.मेडिकल कॉलेज (2 केंद्रांवर) 38 आणि 33, रूबी हॉल क्लिनिकमध्ये 87 असे एकूण 360 जणांना लस देण्यात आली असल्याची माहिती पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ.आशिष भारती यांनी दिली.
तर पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती रूबल अग्रवाल म्हणाल्या, केंद्रसरकारच्या निर्देशानुसार ज्या रुग्णांचे नाव संकेतस्थळावर येते त्यांना लसीकरण केले जात आहे. परंतु कोवीन ॲपचे संकेतस्थळ अद्यापही हँग होत असल्यामुळे अडथळा येत आहे. परंतु आम्ही जे उपस्थित आहेत त्यांच्या इच्छेनुसार लस देतो. जर एखादा कर्मचारी गैरहजर असेल तर त्याऐवजी अन्य दुसऱ्या कर्मचाऱ्यांना लस देत आहोत, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी सांगितले.
