PMC 5th Round of Vaccine : पाचव्या फेरीत 1700 पैकी 1403 जणांचे लसीकरण

एमपीसी न्यूज : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची देशव्यापी मोहीम सुरू आहे. याच्या पहिल्या टप्प्यातील पाचव्या फेरीत सोमवारी पुण्यातील 1700 पैकी 1403 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोव्हिशिल्ड लस देण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात 89, ससून 92, येरवडा राजीव गांधी रुग्णालय 122, कोथरूडमधील जयाबाई सुतार हॉस्पिटल 116 , बी.जे.मेडिकल कॉलेज 57, दिनानाथ मंगेशकर 214, नोबेल हॉस्पिटल 123, भारती हॉस्पिटल 192, बुधराणी इनलॅक्स 74, जोशी हॉस्पिटल 33, रूबी हॉल क्लिनीकमध्ये 100 असे एकूण 1403 जणांना लस देण्यात आली. गेल्या चार फेऱ्यांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ.आशिष भारती यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like