PMC : नदी सुधार प्रकल्पाचे काम थांबवण्याची 65 नागरिकांचे पोलिसांना साकडे

एमपीसी न्यूज : 65 नागरिकांनी कोरेगाव पार्क (PMC) पोलिस ठाण्यात एक निवेदन देऊन पुणे महानगरपालिकेच्या नदी सुधार प्रकल्पाचे काम  त्वरित थांबवण्याची मागणी केली.

त्यांनी ठेकेदारसहित सर्व संबंधितांविरोधात केस दाखल करावी. तसेच पुढील कायदेशीर कारवाई कायद्यातील तरतुदी प्रमाणे करावी, अशी मागणी केली.

Pavna River : पवना नदीत वेस्ट चिकन, मटन टाकण्यासाठी आलेल्या एकाला रंगेहाथ पकडले; गुन्हा दाखल

पुणे महानगरपालीकेने मुळा मुठा नादी पात्रात नदी सुधार प्रकल्पाअंतर्गत मोठ्या प्रमाणात माती टाकण्याचे काम करत आहे. यामुळे नदीच्या पुराच्या पाण्याची वाहन क्षमता खूप कमी होईल. त्यामुळे नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेला धोका निर्माण होईल. यामुळे जैवविविधता आणि जमिनीतील पाण्याचे स्रोत नष्ट होईल.

पुणे महानगरपालिकेचा प्रकल्प हा बेकायदेशीर आहे. राज्य सरकारच्या सरक्युलरप्रमाणे अशा कामांना नदीपात्राच्या निषिद्ध क्षेत्रात परवानगी नाही.

जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्याने पुणे (PMC) महानगरपालिकेच्या मुख्य अभियंत्यास 11 नोव्हेंबर 2018 ला पत्र पाठवून सांगितले होते, की नदी सुधार प्रकल्पाचे काम पूर रेषेच्या आत करताना तेथील नदीच्या प्रवाहात अडथळा येऊ नये. तसेच नदीच्या पूर वहन क्षमतेवर परिणाम होऊ नये.

पुन्हा जलसंपदा विभागाने 15 नोव्हेंबर 2019 ला असेच पत्राने कळवले. 28 ऑक्टोबर 2012 ला जलसंपदा विभागाने पुणे महानगरपालिकेच्या मुख्य अभियांत्यास पत्रात इशारा दिला, की नदी सुधार प्रकल्पाच्या कामांची सुरक्षितता ही स्थानिक स्वराज्य संस्थेवर असेल.

त्यामुळे जीवित व वित्त हानी झाल्यास आणि संभाव्य खटल्यांसाठी संबंधित विभाग किंवा स्थानिक स्वराज्य संस्था जबाबदार असेल.

नदीतील अतिक्रमणामुळे व माती टाकल्यामुळे पुणे महानगरपालिका हजारो नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत आहे व निसर्गाचे न भरून येणारे नुकसान करत आहे.

त्यामुळे पोलिसांनी पुणे महानगरपालिका, ठेकेदार व इतरांविरोधात कारवाई करावी.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.