PMC checked Corona Cold Storage : …तर पुण्यातही कोरोना लसीकरीता कोल्डस्टोरेज उभारणार !

एमपीसी न्यूज : कोरोना विषाणुवर मात करणारी कोव्हिशिल्ड ही लस पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात तयार केली जात आहे. त्यामुळे लाखो इंजेक्शन ठेवण्यासाठी मुंबईमध्ये कोल्डस्टोरेज उभारण्याची तयारी सुरू आहे. परंतु पुण्यात सीरमचे भव्य कोल्डस्टोरेज उपलब्ध असल्यामुळे स्वतंत्र कोल्डस्टोरेज उभारले जाणार नाही. परंतु या संदर्भात चाचपणी पुणे महापालिकेकडून सुरू झाली आहे.

या संदर्भात बोलताना महापालिका आयुक्त रूबल अग्रवाल म्हणाल्या, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भव्य कोल्डस्टोरेज उपलब्ध आहे. परंतु पुणे शहर व जिल्ह्यात लाखो इंजेक्शन ठेवण्यासाठी आवश्यकता भासल्यास मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही कोल्डस्टोरेज उभारणे शक्य होईल का, याचा चाचपणी केली जात आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून किमान 10 लाख इंजेक्सन साठवण क्षमता असलेल्या कोल्डस्टोरेज उभारता येईल का याची पडताळणी केली जात आहे. अजून याबाबत कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.