PMC – नागरिकांनी त्यांचे नाव प्रभागाच्या प्रारूप मतदार यादीमध्ये असल्याची खात्री करावी

एमपीसी न्यूज : पुणे महानगरपालिका (PMC) सार्वत्रिक निवडणूक 2022 च्या अनुषंगाने प्रारुप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या सोबतच पुणे महानगरपालिकेने नागरिकांना त्यांच्या प्रभागाच्या प्रारूप मतदार यादीमध्ये त्यांचे नाव असल्याचे खात्री करण्याचे आवाहन केले आहे. 

31 मे पर्यंत विधानसभा मतदार यादी ग्राह्य धरून प्रभाग निहाय विभागणी करून मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी तयार करताना नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे इत्यादी स्वरूपाची कामे राज्य निवडणूक आयोगामार्फत केली जात नाहीत, असे देखील पालिकेने सांगितले. तर, 31 मे रोजी विधानसभा मतदार यादीमध्ये ज्यांची नावे आहेत; त्यांनाच या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावता येणार आहे, असे पुणे महानगरपालिकेने सांगितले.

Pcmc Election 2022: वाकड प्रभाग सर्वांधिक मतदारांचा तर ताथवडे प्रभागात सर्वात कमी मतदार

मतदार यादी शुद्ध स्वरूपात (PMC) आणि चुका विरहित होण्याच्या दृष्टीने सदर यादीवर हरकती व सूचना मागविण्यात येत असून हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी 23 जून ते 1 जुलैपर्यंत संध्याकाळी कार्यालयीन वेळ संपेपर्यंत असणार आहे. या संबंधित सूचना क्षेत्रीय कार्यालयाकडे अथवा मुख्य निवडणूक कार्यालय स्वातंत्र्यवीर सावरकर भवन शिवाजीनगर येथे दाखल करण्यात येणार आहे. सूचनेच्या अनुषंगाने केवळ मतदार यादी त्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे या संदर्भातील चुका दुरुस्ती करण्यात येणार आहेत. तरी, पुणे शहराच्या नागरिकांनी कृपया आपले नाव प्रभागाच्या प्रारूप मतदार यादीमध्ये असल्याची खातरजमा करावी, असे उपायुक्त डॉक्टर यशवंत माने यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.