PMC Covishield Vaccine programme : महापालिकेला 60 हजार कोव्हिशिल्ड प्राप्त ; 8 सेंटर्सवर 800 जणांना पहिला डोस

एमपीसी न्यूज : बहुप्रतिक्षित कोव्हिशिल्डचे 60 हजार इंजेक्शन पुणे महापालिकेच्या कोल्डस्टोरेजमध्ये दाखल झाले आहेत. 16 जानेवारीला 8 सेंटरवर 800 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जाणार असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल यांनी दिली.

या संदर्भात पुणे महापालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. आशिष भारती म्हणाले, पुणे महापालिकेच्या वतीने 16 कोव्हिड लसीकरण केंद्रांची यादी राज्यसरकारला पाठविण्यात आली होती. त्यापैकी केवळ 8 केंद्र मंजूर करण्यात आली. महापालिकेकडे सध्या 60 हजार कोव्हिशिल्ड इंजेक्शन आहेत.

त्यापैकी 12 हजार इंजेक्शन एएफएमसी मेडीकल कॉलेज, पुणे, देहू आणि खडकी कँटोन्मेट हॉस्पिटलसह केंद्र सरकारच्या हॉस्पिटलला द्यावे लागणार आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेला 48 हजार इंजेक्शन मिळतील. त्यामध्ये 5 हजार इंजेक्शन वाया जरी गेली तरी 43 हजार इंजेक्शन मिळतील. त्यापैकी 16 जानेवारीला पहिल्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्कर्सना 22 हजार डोस देण्याचे लक्ष्य आहे, असे त्यांनी सांगितले.

या 8 कोविड लसीकरण केंद्रांवर होणार लसीकरण….

1. राजीव गांधी हॉस्पिटल, येरवडा
2. कमला नेहरू हॉस्पिटल, मंगळवार पेठ
3. ससून हॉस्पिटल, पुणे स्टेशन
4. सुतार दवाखाना, कोथरूड
5. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, एरंडवणा
6. रूबी हॉल क्लीनिक, ताडीवाला रोड
7. नोबल हॉस्पिटल, हडपसर
8. भारती हॉस्पिटल, धनकवडी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.