_MPC_DIR_MPU_III

PMC Fourth round of vaccine : चौथ्या फेरीत 1628 पैकी 921 जणांचे लसीकरण

एमपीसी न्यूज : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची देशव्यापी मोहीम सुरू आहे. या मोहीमेच्या पहिल्या टप्प्यातील चौथ्या फेरीत आज (सोमवारी दि.25 जानेवारी) पुण्यातील 1628 पैकी 921 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोव्हिशिल्ड लस देण्यात आली.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात 85, ससून 76, येरवडा राजीव गांधी रुग्णालय 54, कोथरूडमधील जयाबाई सुतार हॉस्पिटल 120 , बी.जे. मेडिकल कॉलेज 29, दिनानाथ मंगेशकर 202, नोबल हॉस्पिटल 117, भारती हॉस्पिटल 138, रूबी हॉल क्लिनिकमध्ये 100 असे एकूण 921 जणांना लस देण्यात आली असल्याची माहिती पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी दिली.

दरम्यान, केंद्रसरकारच्या निर्देशानुसार ज्या रुग्णांचे नाव संकेतस्थळावर आल्यानंतर संबंधितांना लसीकरण केले जात आहे. परंतु कोवीन ॲपचे संकेतस्थळ अद्यापही हँग होत असल्यामुळे अडथळा येत आहे. परंतु आम्ही जे उपस्थित आहेत त्यांच्या इच्छेनुसार लस देतो. जर एखादा कर्मचारी गैरहजर असेल तर त्याऐवजी अन्य दुसऱ्या कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.