Pune : समाधान योजनेंतर्गत पालिकेच्या तिजोरीत साडेसात लाखांचा मिळकतकर जमा

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून नुकतीच समाधान योजना राबविण्यात आली. दोन दिवस आयोजित केलेल्या या योजनेंतर्गत 7 लाख 57 हजार 968 रुपये मिळकतकर पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. 
महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडून सन 2019-20 या आर्थिक वर्षाचे अपेक्षित उद्दीष्ठ गाठण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांमधील मिळकतधारकांना मिळकतकर भरणे सुलभ व्हावे, तसेच कर भरण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी या गावांमध्ये दोन दिवस नुकतीच समाधान योजना राबविण्यात आली.

ज्या मिळकतींना अद्याप कर आकारणी झालेली नाही, तसेच पूर्वी कर आकारणी झाली आहे, मात्र मिळकतीच्या वापरात बदल आहे, अशा मिळकतधारांचे अर्ज या योजनेद्वारे त्या-त्या गावात स्वीकारण्यात आले. यावेळी मिळकतधारांच्या मागणीनुसार वापरात बदल आणि नाव, पत्ता, सदनिका, दुकान क्रमांक त्वरीत दुरुस्त करून देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत नमुना नं. 8 ड रजिस्टारला नोंद असलेल्या मिळकतींचे पालिकेच्या मान्य व प्रचलित धोरणानुसार फेर आकारणी करण्यात आली. तसेच यावेळी मिळकतधारकांच्या शंकांचे निरसन करून मार्गदर्शन करण्यात आले.
या योजनेत 2 हजार 75 मिळकतधारकांनी सहभाग घेतला. त्यात 1 हजार 69 मिळकतधारकांनी कर आकारणीसाठी अर्ज केले. तर 68 मिळकतधारकांनी नावात बदल करण्यासाठी आणि 123 मिळकतधारकांनी इतर तक्रारी अर्ज केले. यावेळी 7 लाख 57 हजार 968 मिळकतधारकांनी आपला कर भरल्याचे सह पालिका आयुक्त व कर आकारणी व कर संकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.