PMC : फुरसुंगी आणि उरुळी देवाची स्वतंत्र नगरपरिषदेच्या 6000 हरकतीवर सोमवारपासून सुनावणी

एमपीसी न्यूज  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन (PMC) गावे पुणे महापालिकेतून वगळण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र त्यांच्या विलगीकरणावर आक्षेप घेणाऱ्या सुमारे सहा हजार हरकती नागरिकांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केल्या होत्या. या हरकतींवर येत्या सोमवारपासून सुनावणी करण्यात येणार आहे.  

फुरसुंगी आणि उरुळी देवाची या स्वतंत्र नगरपरिषद करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली होती. या प्रक्रियेनंतर आणि यावर्षी मार्चमध्ये नागरिकांना हरकती मांडण्याची परवानगी देण्यात आली. यानुसार 6000 हरकती दाखल झाल्या होत्या.

PCMC : लोखंडी खिळा अडकल्यामुळे लिफ्ट पडली बंद 

उपजिल्हाधिकारी किंवा अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची या तक्रारींवर (PMC) लक्ष ठेवण्यासाठी नियुक्ती केली जाणार आहे. प्राप्त होणारा हा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख राज्य सरकारला सादर करणार. आणि त्या नंतरच राज्य सरकार फुरसुंगी-उरुळी देवाची स्वतंत्र नगरपरिषदेच्या स्थापनेबाबत अंतिम निर्णय देणार.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.