PMC : गणेश विसर्जनासाठी महापालिका सज्ज

एमपीसी न्यूज – दरवर्षीप्रमाणे यंदाही (PMC ) पुणे महापालिकेने गणेश विसर्जनाची तयारी पुर्ण केली असून महापालिकेने विसर्जन घाट व तेथील यंत्रणा सज्ज केली आहे. गणेशोत्सवाच्या तयारीचे दृष्टीने 15 क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातील सार्वजनिक स्वच्छता, मिरवणूक मार्गावर स्वच्छता व औषधोपचाराची व्यवस्था, ग्रुप स्विपींग, कंटेनर, निर्माल्य कलश, किटकनाशक फवारणी, विसर्जन घाटांवर अग्निशमनदल कर्मचारी व्यवस्थापन, घाटांवर औषध फवारणी, नदी किनारच्या विसर्जन घाटांवर तसेच ज्या भागात नदी, तलाव, विहीरी नाहीत अशा परिसरातून विसर्जन हौद, लोखंडी टाक्यांची सोय करण्यात आलेली आहे.

त्याच बरोबर जीवरक्षकांच्या नियुक्त्या, सुरक्षा यंत्रणा, विद्युत जनित्र, ध्वनिक्षेपक यंत्रणा,जलवाहिनी व मलवाहिन्या यांचे गळती ठिकाणी त्वरीत दुरुस्ती कामे करणेकरिता स्वतंत्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करणेत आलेल्या आहेत. ध्वनीक्षेपकाची व प्रकाशाची व्यवस्था करणेत आलेली आहे. सार्वजनिक स्वच्छता गृहे, शौचालयांची स्वच्छता, फिरती शौचालये, सुचना फलक आदी स्तरावरुन तयारी करणेत आलेली आहे.

प्रमुख विसर्जन घाट खालीलप्रमाणे – PMC 

1. संगम घाट 2.वृद्धेश्वर घाट / सिध्देश्वर घाट 3. अष्टभुजा मंदिर (नारायण पेठ) 4. बापू घाट (नारायण पेठ) 5. विठ्ठल मंदिर (अलका चौक) 6. ठोसर पागा घाट 7. राजाराम पूल घाट, सिध्देश्वर मंदिर 8. चिमा उद्यान येरवडा 9. वारजे कर्वेनगर, गल्ली क्र. 1 नदीकिनारी 10 नेने/आपटे घाट 11. ओंकारेश्वर 12. पुलाची वाडी, नटराज सिनेमा मागे 13. खंडोजीबाबा चौक 14. गरवारे कॉलेजची मागील बाजू 15. दत्तवाडी घाट 16. औंधगाव घाट 17. बंडगार्डन घाट 18 पांचाळेश्वर घाट

आरोग्य विभागाच्या वतीने केलेली तयारी –

आरोग्य खात्याकडे 4 मोबाईल क्लिनिक असून त्या गणेश विसर्जन मार्गावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या मोबाईल क्लिनिक मार्फत वैद्यकीय तपासणी व औषधोपचार केले जातील. आपत्कालीन परिस्थितीमध्ये या सर्व मोबाईल क्लिनिक सोबत 108 च्या अॅम्ब्युलन्स सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

संपूर्ण गणेशोत्सव दरम्यान (PMC ) पुणे महानगरपालिके अंतर्गत असणारे सर्व दवाखाने व रुग्णालयामध्ये मोफत औषधोपचार देण्यात येतील. सर्व गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष यांना भेटून हस्त पत्रिके वाटप करण्यात येणार असून सार्वजनिक ठिकाणच्या गणेशोत्सव मंडप व विसर्जन हौद येथे आरोग्य विषयी बॅनर्स लावणेत येणार आहेत. टेम्पोद्वारे आरोग्य विषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

पुनरावर्तन उपक्रमाची आणि शाडू माती संकलन केंद्राविषयी सविस्तर माहिती –

www.punaravartan.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणे महापालिकेने पुणे शहरामधील 1183 सार्वजनिक स्वच्छतागृहांची (CT/PT) माहिती टॉयलेटसेवा app मध्ये उपलब्ध करून दिली आहे.टॉयलेटसेवा app मध्ये पुणे शहरामधील कुठलाही पत्ता टाकून पुणे महापालिकेची सार्वजनिक स्वच्छतागृहे शोधता येतील.

गणेशोत्सवाच्या आधी पुणे शहरामधील सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये QR Code स्टिकर लावले जातील. टॉयलेटसेवा app चा वापर करून नागरिकांनी ह्या माहितीचा फायदा घ्यावा, सार्वजनिक स्वच्छतागृहांविषयीचा आपला अभिप्राय टॉयलेटसेवा app मधून रेटिंग्सच्या मार्फत आणि issues रिपोर्ट करून कळवावा असे आवाहन पुणे महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

अग्निशमन दलाकडून करण्यात येत असलेली व्यवस्था-

1. गणेशोत्सवाचे काळात विविध दिवशी गणपती विसर्जन करण्यात येते,अशाप्रकारे प्रामुख्याने गणपती विसर्जन होणाऱ्या मुठा नदीकाठच्या मुठानदीकाठच्या एकूण 14 घाटांवर भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पुणे मनपा अग्निशमन दलाच्या वतीने 17 फायरमन सेवक व 111जीवरक्षक तैनात करण्यात आलेले आहेत.

2. घाटावर नेमलेल्या जीवरक्षक यांना त्यांचे काम अधिक सुरक्षिततेने व कार्यक्षमतेने करता येण्याच्या उद्देशाने लाईफ जॅकेटस, लाईफ बॉय व रात्रीच्या वेळेस जीवरक्षक पटकन नजरेस पडण्याच्या दृष्टीने फ्लोरोसेंट जॅकेटस उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.

3. प्रत्येक घाटावर नदीकिनारी नागरिक व त्यांचे समवेत येणाऱ्या लहान मुलांनी गर्दी करु नये, म्हणून नदी किनारी आडवा दोरखंड लावण्यात आलेले आहे. तसेच काही घाटांवर नदीचे पात्रामध्ये आडवा दोर बांधण्यात आलेला आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती चुकून प्रवाहाबरोबर वाहून गेल्याने, या दोरखंडास धरुन आपला जीव वाचवू शकते. नटराज घाटावर लाईफ मास्ट बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपत्कालीन प्रसंगी नदीच्या पात्रामध्ये मोठा उजेड उपलब्ध करुन बुडणाऱ्या व्यक्तीस वाचविता येणे शक्य होणार आहे.

4. नागरिकांना शक्यतो नदीच्या पात्रात आतापर्यंत जाऊ न देता, काठावरच गणपती विसर्जन करण्यास सांगण्यात येते. बऱ्याचदा अग्निशामक दला कडील जवान व भोई लोकांकडूनच गणपतींचे विसर्जन करण्यात येते.

5. अनंत चतुर्थीचे दिवशी वृध्देश्वर घाट, संगम घाट, अमृतेश्वर घाट व नटराज सिनेमा जवळील घाट येथे भोई लोकांकडून नावेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच दलाकडून रोजंदारीवरील ज्या बिगाऱ्यांची जीवरक्षक म्हणून नेमणूक करण्यात येते. त्यांचेकडूनही काही नावांची व्यवस्था केली जाते.

6. जीवरक्षक ओळखू यावेत म्हणून त्यांना जीवरक्षक अशी अक्षरे रंगवलेले शर्ट्स व दंडाला बांधावयाच्या पट्ट्या देण्यात आलेल्या आहेत.

7.अनंत चतुर्दशीचे दिवशी गणेश विसर्जनाचा अंतिम दिवस असल्याने व यादिवशी शहरातून गणेश विसर्जनाची भव्य मिरवणूक निघत असल्याने, मिरवणूकीत काही अनुचित प्रकार घडल्यास तातडीने आवश्यक ती मदत पाठविणे अथवा मिरवणूकी संबंधीची माहिती मिळवण्यासाठी, मिरवणुकीच्या मार्गावर तीन ठिकाणी अग्निशमन दलाची बिनतारी संदेश मदत केंद्र उभारण्यात आलेली आहे.

Chinchwad : चिंचवड येथील घाटावर 1853 गणेश मूर्तींचे दान

8. मिरवणूकीचे मार्गावर, लक्ष्मी रस्त्यावरील कॉमनवेल्थ इमारतीचे आवारात सदरील ठिकाणी फायर बुलेट सह अग्निशमन दलाचे जवान तैनात ठेवण्यात येतात.

9. मुख्य विसर्जन मिरवणूकीत काही कारणास्तव आगीचा प्रादुर्भाव झाल्यास सदरील आग तातडीने विझविण्याचे उद्देशाने कॉमनवेल्थ इमारत येथील बिनतारी संदेश मदत केंद्रात आवश्यक ते फायर एक्स्टिंग्वीशर्स व ते हाताळण्यास दलाचे सेवक उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत.

10.अग्निशमन दला कडील सर्व अधिकारी व जवानांच्या सर्व प्रकारच्या रजा व आठवडा सुट्या बंद करण्यात येऊन या कालावधीत 18 घाटांवर अग्निशमन दलाकडील अधिकारी स्वत: उपस्थित रहाणार आहेत.
11. संपूर्ण गणेशोत्सव कालावधीत मुठा नदीकिनारीचे विसर्जन घाट वगळता शहरातील अन्य विसर्जनाच्या ठिकाणी संबंधित क्षेत्रीय कार्यालयांकडून त्यांचे स्तरावर जीव रक्षकांची नेमणूक करण्यात येते.

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाच्या दुरध्वनी क्र.101 वर संपर्क साधावा.

1. गणेश मुर्तीचे विसर्जन करताना लहान मुलांना नदी, कॅनॉल, विहीरी, तळे या पासून दूर उभे करुन त्यांच्याजवळ जबाबदार व्यक्तीने थांबावे.
2.नाव/होडीतून गणपती विसर्जन करताना त्यात क्षमतेपेक्षा अधिक व्यक्तींनी बसू नये, तसेच बसलेल्या व्यक्तींनी नाव/होडीस अपघात होईल असे वर्तन
करुन नये.
3. पुणे मनपाच्या वतीने नदीकाठी नेमण्यात आलेल्या जीवरक्षक सेवकांकडून शक्यतो गणेश मुर्तीचे विसर्जन करून घ्यावे.
4. एखादी व्यक्ती पाण्यात बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास, त्याची कल्पना नदीकाठी नेमलेल्या जीवरक्षक यांना तातडीने द्यावी.
5.मद्यपान केलेल्या अवस्थेत नदीपात्र, तलाव, कॅनॉल, विहीर, तळे इत्यादी जवळ जाऊ नये.
6. पावसामुळे नदीकाठचा परिसर निसरडा झालेला असल्यास अशा ठिकाणी काळजीपूर्वक वापरावे.
7. अनुचित प्रकार, अनुचित घटना टाळण्यासाठी कृपया अधिकृत घाट, मनपाने विविध ठिकाणी बांधलेले विसर्ज़न हौद व मनपाच्या क्षेत्रिय कार्यालयांनी गणेश विसर्जनासाठी केलेल्या व्यवस्थेच्या ठिकाणी कृपया गणेश मुर्तीचे विसर्जन करावे.

आपत्कालीन संपर्क दुरध्वनी क्रमांक –

1.020-25501269
2.020 – 25506800(1/2/3/4)
संपर्क मोबाईल क्रमांक
1. गणेश सोनुने , आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, पुणे महानगरपालिका
मोबाईल नं. 9689931511
2..देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, मोबाईल नं. 8108077779/ 020-26451707,(101)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.