PMC News : पुणे महापालिकेच्या प्लास्टीक कचरा संकलन स्पर्धेला मुदतवाढ

एमपीसी न्यूज – नागरिकांच्या मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादामुळे (PMC News) पुणे महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या प्लास्टीक कचरा संकलन स्पर्धेला 15 मार्चपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. आत्ता पर्यंत नागरिकांनी 248 किलो प्लास्टीक बॉटल जमा करून महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयामध्ये जमा केल्या आहेत.

शहरातील प्लास्टिक कचऱ्याच्या संकलनास चालना मिळावी व नागरीकांना प्लास्टिक कचरा संकलनाची सवय लागावी, यासाठी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी 1 फेब्रुवारी रोजी ‘प्लास्टिक कचरा संकलन स्पर्धे’ची घोषणा केली होती.

महापालिकेने 1 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत या कचरा संकलन स्पर्धेचे आयोजन केले होते.कमिन्स इंडिया या संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्यांना स्मार्टफोन, स्मार्टवॉच, इलेक्‍ट्रिक बाईक अशा स्वरूपाची बक्षिसेही अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी जाहीर केले होती.

या स्पर्धेला चांगला प्रतिसादस देत पुणेकरांनी 27 दिवसात 248 किलो प्लास्टीक कचरा जमा केला आहे. यात घोले रस्ता क्षेत्रिय कार्यालय हे कचरा संकलना मध्ये आघाडीवर आहे. महापालिकेने अधिकृत केलेल्या रिसायक्‍लर्स किंवा प्रोसेसर्सकडे संकलित झालेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांमधून आकर्षक म्युरल्स, पेव्हर ब्लॉक्‍स, इंटरलॉकिंग ब्लॉक्‍स इ. साहित्य बनवून त्याचा वापर शहर सौंदर्यीकरण किंवा उद्याने, रस्ते, फुटपाथच्या (PMC News) सुशोभीकरणासाठी करणार असल्याचे ही महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Swargate : स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुख्यात गुंडाचा राडा; चौघांवर हल्ला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.