Pune News : दिवाळीपूर्वी शहरात आणखी शिथीलता – महापालिकेचे आदेश

एमपीसी न्यूज – कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने शहरात आणखी शिथीलता देण्यात आली असून महापालिकेने सर्व व्यापारी दुकाने रात्री 11 आणि हॉटेल, रेस्टॉरंट व बार रात्री 12 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देणारे आदेश काढले आहेत. या आदेशामध्ये सग्रहालयेही उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

करोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेमुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे समाजातील सर्व घटकांवर विपरीत परिणाम झाला आहे. मात्र, दुसरी लाट बर्‍यापैकी कमी होऊन सक्रीय रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. दुसरीकडे लसीकरण मोहिमही चांगल्याप्रकारे राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंध शिथील करण्याची प्रक्रीया शासनाने हाती घेतली आहे. शासनाने नुकतेच शाळा आणि महाविद्यालये देखील सुरू केली आहेत.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर व्यापारी दिकाने व इतर गोष्टींसाठी आणखी शिथीलता देण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार राज्य शासनाने नुकतेच शिथीलतेचे आदेश काढले आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनानेही बुधवारी आदेश काढत शहरासाठी आणकी शिथीलता दिली आहे.

या आदेशानुसार शहरातील दुकाने अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. तसेच सर्व रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. तर अ‍ॅम्युझमेंट पार्क, संग्रहालये व संलग्न उद्योग 22 सप्टेंबरपासून सुरू करता येतील. अ‍ॅम्युझमेंट पार्कमध्ये पाण्यामधील राईड्स वगळता अन्य सर्व खेळ सुरू ठेवता येतील. हे आदेश पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डालाही लागू असतील, असेही या आदेशात नमूद आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.