Pune News : महापालिका रक्तपेढीसाठी उपकरणे खरेदीस मान्यता

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, कमला नेहरू रुग्णालयातील मधुकर बिडकर रक्तपेढीसाठी आवश्यक असणारी शस्त्रे आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, ‘महाटेंडर पोर्टलवर मागविण्यात आलेल्या निविदांपैकी पात्र ठरलेल्या दोन निविदाधारकांकडून सुमारे दोन कोटी अडतीस लाख पंचावन्न हजार रुपयांची शस्त्रे आणि उपकरणे खरेदी केली जाणार आहेत. ही महापालिकेची पहिलीच रक्तपेढी ठरणार आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.