Pune : जायका प्रकल्पाच्या अभ्यासासाठी अधिकाऱ्यांची परदेशवारी 

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय नदी कृती कार्यक्रमांतर्गत पुणे शहरात निर्माण होणा-या संपूर्ण मैलापाण्यावर प्रक्रिया करून नदीत सोडण्यासाठी जायका प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत २० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत जपान, अमेरिका, कॅनडा येथे अभ्यास दौरा आयोजित केला असून, त्यामध्ये पालिकेचे दोन अधिकारी सहभागी होण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

केंद्र शासनातर्फे राष्ट्रीय नदी संवर्धन निर्देशालय, जपान आणि पुणे महापालिकेमध्ये या प्रकल्पासाठी करार करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी जपानच्या जायका संस्थेमार्फत प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक केली आहे. महापालिकेने हा प्रकल्प राबविण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. जायका प्रकल्पांतर्गत २० ऑक्टोबर ते २ नोव्हेबर या कालावधीत अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. यासाठीचा संपूर्ण खर्च संबंधित सल्लागार करणार आहे.
या अभ्यास दौ-यासाठी पालिकेला कोणताही खर्च करावा लागणार नाही. पालिकेच्या वतीने जायका प्रकल्पाचे वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक व्ही. जी. कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता रामचंद्र देशपांडे यांना पाठविण्यास स्थायी समितीने मान्याता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.