PMC : कबुतराला खायला देणे पडले महागात; पीएमसीने ठोठावला दंड

एमपीसी न्यूज : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) आज कल्याणीनगर येथील (PMC) एका शॉपसमोर  कबुतरांना खायला घालणाऱ्या एका व्यक्तीला पकडले असून त्याच्याकडून 500 रुपये दंडही वसूल केला आहे.

कारवाई केलेल्या व्यक्तीचे नाव विक्रम चौधरी असून जारी केलेल्या नियमाप्रमाणे त्याच्याकडून 500 रुपयांचे चलन घेण्यात आले. ही घटना आज सकाळी 8 वाजता घडली.

कबुतरांमुळे न्यूमोनियाचे प्रमाण वाढत असून कबुतराना खायला देणाऱ्या विरोधात 500 रुपये दंड आकारला जाणार असल्याचे महानगरपालिकेने जाहीर केले होते. तरीही काहीजण कबुतरांना खायला घालत असल्याने महापालिकेने अशी कारवाई करून, भविष्यात असे वर्तन खपवून घेतले जाणार नाही, याचे उदाहरण दिले आहे.

Chinchwad : कुख्यात गुंड बाळा वाघेरेला राहत्या घरातून अटक

कल्याणीनगरमधील रहिवाशांनी या समस्येकडे सक्रियपणे लक्ष दिल्याबद्दल पीएमसीचे आभार व्यक्त केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.