PMC Property tax : पालिकेच्या तिजोरीत अभय योजनेपोटी 341 कोटींचा भरणा !

एमपीसी न्यूज : महापालिकेचा मुख्य आर्थिक स्त्रोत असलेल्या मिळकत कराच्या थकबाकीची वसुली सुरू आहे. त्यासाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेत तब्बल 1 लाख 10 हजार 110 मिळकतधारकांनी जमा एकूण 341 कोटींचा भरणा महापालिकेच्या तिजोरीत केला. यामुळे आर्थिक विंवचनेत असलेल्या महापालिकेला संजीवनी मिळू शकणार आहे.

महापालिकेची अभय योजना 50 लाखांहून जास्त मिळकतकर थकबाकीदारांना सवलत देत वसुली करण्यासाठी राबविण्यात आली. नोव्हेंबरच्या एका महिन्यात म्हणजे 30 दिवसांत 59 हजार 647 मिळकतधारकांनी 218 कोटी जमा केले. तर मागील सात दिवसांत 29 हजार 916 मिळकतधारकांनी 132 कोटींचा भरणा केला.

विशेष म्हणजे मागील चार दिवसांत 20 हजार 805 मिळतकधारकांनी 100 कोटी रुपयांचा भरणा पालिकेच्या तिजोरीत केला. चालू वर्षी 30 नोव्हेंबर अखेर 1 हजार 190 कोटी जमा केले आहेत. मागील वर्षी याचं कालावधीत 1 हजार कोटी जमा केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.