PMC Property tax collection : इतिहासात पहिल्यांदा मिळकतकरापोटी पालिकेच्या तिजोरीत 1301 कोटींचा भरणा !

एमपीसी न्यूज : महापालिकेचा मुख्य आर्थिक स्त्रोत असलेल्या मिळकतकरापोटी महाालिकेच्या तिजोरीत इतिहासात पहिल्यांदाच तब्बल 1 हजार 301 कोटी 25 लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. परिणामी आर्थिक टंचाईमुळे मरगळ आलेल्या महापालिकेला नववर्षात संजीवनी मिळाली आहे.

पुणे महापालिकेच्या अधिकारक्षेत्रात जवळपास 10 लाख हजार मिळकती आहेत. त्यापैकी बहुतांश मिळकतधारक नागरिकांकडून वेळेवर मिळकत कर भरला जात नव्हता. त्यामुळे त्यांना महापालिका अधिनियमानुसार एकूण रकमेवर 2 टक्के प्रत्येक महिन्याला शास्ती कर लावला जात होता.

1 मार्च 2020 ते 31 डिसेंबर 2020 दरम्यानच्या 9 महिन्यात 1301 कोटींचा भरणा पालिकेच्या तिजोरीत झाला आहे. 7 लाख 39 हजार 173 मिळकतधारकांनी कर भरला आहे. गतवर्षी म्हणजे 2019 च्या आर्थिक वर्षाच्या 9 महिन्यात 1 हजार 92 कोटी 84 लाख रुपयांचा भरणा झाला होता.

तसेच 2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2020 दरम्यान राबविण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील अभय योजनेतून मिळकतकराच्या वसुलीतून महापालिकेला 351 कोटी 18 लाख रुपये मिळाले आहेत. तर 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यात 70 कोटी 26 लाख रुपये जमा झाले आहेत. यामुळे आर्थिक विंवचनेतील महापालिकेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान अन्य थकबाकीदारांना महापालिका प्रशासनाकडून नोटीसा पाठविण्यात आल्या असून थकबाकी न भरल्यास कायदेशीर कारवाईनुसार सदर मिळकती सील केल्या जाणार असून शास्तीकर व विलंब दंडासह थकबाकी वसूल केली जाईल, असे महापालिकच्या मालमत्ता व मिळकतकर विभागाकडून कळविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.