PMC : पुणे विमानतळ ते विमान नगर हा पर्यायी रस्ता होणार; संरक्षण मंत्रालयाची परवानगी

एमपीसी न्यूज : पुणे विमानतळावरील 0.58 एकर (2350 चौरस मीटर) संरक्षण भूमीवर विमान नगरला पर्यायी रस्ता जोडण्याचे काम करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने पुणे महानगरपालिकेला (PMC) परवानगी दिल्याची माहिती खासदार गिरीश बापट यांनी दिली आहे.

बापट म्हणाले की, पुणे विमानतळ ते विमान नगरला जोडणारा पर्यायी रस्ता असलेल्या संरक्षण जमिनीच्या केवळ 0.58 एकर (2350 चौ.मी.) जागेवर पीएमसीने काम करण्यास परवानगी दिली नसल्याने, हा रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. त्यामुळे नागरिकांना विमान नगर आणि विमानतळावर जाण्यासाठी दूरच्या अन्य पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागला.

तसेच, या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (PMC) झाली होती. पर्यायाने नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्यास विलंब व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. तसेच, हा रस्ता नव्याने विस्तारित विमानतळासाठी अत्यंत आवश्यक होता. त्यामुळे ही जागा नाममात्र दरात पालिकेला उपलब्ध करून तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी पुण्याचे खासदार बापट संरक्षण मंत्री, नागरी उड्डाण मंत्री आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत होते.

Alandi Rural Hospitals : अखेर नगरपरिषदेने ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात वाहने आणि फेरीवाल्यांना केली बंदी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.