PMC Road Work : पीएमसीने 10 जूनपर्यंत वाढवली रस्ते दुरुस्तीच्या कामांची मुदत

एमपीसी न्यूज : पुणे महानगरपालिकेने रस्ते दुरुस्ती (PMC Road Work) प्रकल्पांची अंतिम मुदत 10 जूनपर्यंत वाढवली आहे. वीज, टेलिफोन, पाणीपुरवठा, नियमित देखभाल, मेट्रो आणि इतर खाजगी कामांसाठी संपूर्ण शहरात जवळपास 120 किमी रस्ते खोदण्यात आले आहेत.

पीएमसीच्या रस्ते विभागाचे प्रमुख व्हीजी कुलकर्णी म्हणाले,  कि “जल विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (एमएसईबी) आणि पुणे मेट्रो रेल्वेची विशेष कामे 30 मे पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. इतर सर्व प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका रस्ते भरण्यासाठी 26 मे ते 27 मे पर्यंत निविदा काढेल. रस्ता भरण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम प्रस्ताव असलेल्या फर्मची निवड केली जाईल.” पीएमसी रस्त्यांच्या देखभालीवर वर्षभरात अंदाजे रु. 40 ते 50 कोटी खर्च करते. यावर्षी सर्वाधिक खोदकाम 24×7 पाणीपुरवठा प्रकल्पासाठी (PMC Road Work) करण्यात आले आहे.

जलविभागाच्या मान्सूनपूर्व तयारीबाबत विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, कि “पावसाळ्यात लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही नवीन धोरणे राबवण्याचा विचार करत आहोत. आम्ही आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊ.”

Pune FY Admission : पुणे शिक्षण संचालक मंडळतर्फे अकरावीच्या प्रवेशाचा फॉर्म जारी

विभागाची योजना अशी आहे, की प्रथम 100 मीटरचा रस्ता खोदून, लाईन टाकणे. रस्ता पुनर्संचयित करणे आणि नंतर इतर भागात जाणे. यामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था टाळता येईल. “आम्ही गजबजलेल्या पेठ भागात रस्ते खोदणार नाही. अरुंद रस्त्यांवर काम केल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात रहदारी होऊ शकते,” असे पावसकर म्हणाले.

जलविभागाचा विशेष प्रकल्प गेल्या पावसाळ्यात कधीच पूर्णपणे थांबला नाही. “विशिष्ट भागात पाणीपुरवठा प्रकल्प सुरू राहतील आणि त्यानुसार वाहतूक समायोजन केले जाईल. मात्र, त्यासाठी आयुक्तांची विशेष परवानगी घ्यावी लागेल, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

पुढे पावसकर म्हणाले की, ‘परवानग्यांबाबत यापूर्वीच चर्चा झाली आहे. लेखी परवानगीही लवकरच घेतली जाईल.  गेल्या काही महिन्यांत आम्ही जे रस्ते खोदले आहेत ते अंतिम मुदतीपूर्वी भरले जातील.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.