PMC Schools Reopen : पुणे महापालिकेच्या शाळांना पहिल्याच दिवशी 30 टक्के विद्यार्थ्यांचा प्रतिसाद !

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेच्या नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा महाविद्यालये आजपासून सुरु झाली. परंतु पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे अत्यल्प म्हणजे 30 टक्के प्रमाण असल्यामुळे महापालिका प्रशासनाकडून पुन्हा नव्याने सर्वेक्षण सुरु करण्यात येत आहे.

महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या माहितीनुसार पुणे महापालिकेच्या एकूण 44 शाळा महाविद्यालये आहेत. त्यामध्ये सुमारे 8 हजार 500 विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेतात. त्यापैकी केवळ 3 हजार 200 विद्यार्थ्यांनी पालकांचे संंमतीपत्रे दिली आहेत. आज पहिल्या दिवशी शाळेमध्ये 100 टक्के शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तर एकूण विद्यार्थी संख्येच्या 30 टक्के विद्यार्थी उपस्थित होते.

तरी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून शाळांतील वर्गखोल्या, स्टाफरुम, प्रयोगशाळा, स्वच्छतागृहांचे निर्जंतुकरण केले गेले आहे. शारीरिक आंतरपालनाचे नियम पाळून बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. येत्या आठवडाभरात उपस्थितांची संख्या वाढेल, असा विश्वास महापालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.