PMC news: पालिकेच्या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार टॅब!

PMC Students to get new Tabs.

एमपीसी न्यूज : कोरोना महामारीमुळे देशभरात ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र, महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणार्‍या गोरगरिब कुटुंबातील यंदाच्या वर्षी दहावीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना मोबाईल, इंटरनेट अशा प्रकारची कुठलीच व्यवस्था नसल्याने त्यांना नवीन टॅब देण्यात येणार आहे.

स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. नगरसेवक राजेंद्र शिळीमकर आणि आमदार सुनिल कांबळे यांनी हा प्रस्ताव मांडला होता.

करोनामुळे सध्या सर्वच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. महापालिकेच्या शाळेमध्ये गरिब कुटुंबातील विद्यार्थी आहेत. अनेकांना मोबाईल, टॅब अथवा संगणकाची सुविधा नसल्याने त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.

महापालिकेच्या शाळेतील जवळपास १ हजार १५० विद्यार्थी यंदा दहावीच्या वर्गात आहेत. तसेच आठवी व नववीतील विद्यार्थ्यांची संख्याही अडीच हजारांच्या आसपास आहे.

या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या माध्यमातून टॅब उपलब्ध करून दिल्यास अभ्यासात मदत होणार आहे. त्यामुळे टॅब पुरविण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.