Pune : पुणे शहरातील बेवारस वाहने महापालिका उचलणार

एमपीसी न्यूज – स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत पुणे महापालिकेतर्फे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. पुणे शहर स्वच्छ राहावे यासाठी रंगरंगोटी करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील बेवारस वाहने महापालिका उचलणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.

शहरातील विविध उड्डाणपुलांखाली, पोलीस चौकी परिसरात, नदीपात्रात ही वाहने मोठ्या संख्येने उभी करून कसेही पार्किंग केले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्ता अडविला जातो. सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडी होते. सुमारे 6 हजार बेवारस वाहने शहरात असल्याचेही जगताप म्हणाले. या गाड्या पोलीस आणि महापालिकेच्या जागेवर ठेवण्यात येणार आहेत. या वाहन मालकांना आधी नोटिसा काढण्यात येणार आहे. त्यांनतर 5 – 6 दिवसांनी वाहने उचलून नेण्यात येणार आहे. आरटीओ, वाहतूक पोलीस आणि महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी एकत्र बसून ही कारवाई करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.