Pune News: स्मार्ट सिटीच्या एटीएमएस सिस्टिमच्या परिचालन व देखभाल खर्च महापालिका करणार  : स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची अडॅप्टीव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमचा (एटीएमएस) पुढील पाच वर्षांसाठी ५७ कोटी ९४ लाख रुपये (कर अतिरिक्त) परिचालन व देखभाल खर्च करण्याच्या निविदेस आज स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, या प्रकल्पासाठी आवश्यक असणारा १०२ कोटी ६२ लाख रुपयांचा भांडवली खर्च पुणे स्मार्ट सिटी करणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढील पाच वर्षांसाठी दरवर्षी ११ कोटी ५८ लाख रुपये याप्रमाणे पाच वर्षांसाठी ५७ कोटी ९४ लाख (कर अतिरिक्त) रुपयांच्या खर्चाची जबाबदारी पुणे महापालिकेने स्वीकारली आहे.

रासने पुढे म्हणाले, या आधुनिक संगणकीय प्रणालीमुळे प्रवासाला लागणार वेळ कमी होईल, नेटवर्क सरासरीची गती वाढेल, स्टॉप लरइल प्रतीक्षा कमी होईल, ग्रीन वेव्ह (पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन गाड्या, फायर, बीआरटी) वापरून आपत्कालिन स्थितीत व्यवस्थापकीय करण्यास अनुमती देता येईल. त्यामुळे प्रवास वेळेची विश्र्वासार्हता सुधारता येईल, प्रवासाचा अंदाज येईल, ट्रॅफीक सिग्नलची कार्यक्षमता वाढेल, सुरक्षितता वाढेल, शहरातील प्रदूषण पातळी घट होईल आणि शहरभर वाहतुकीची माहिती सामाइक करण्यासाठी डेटा प्लॅटफॉम तयार करता येईल. एटीएमएसच्या मुख्य घटकांमध्ये जंक्शनवरील अडॅप्टिव्ह ट्रॅफीक कंट्रोलर, ट्रॅफीक लाइटस, ट्रॅफीक सेन्सार, व्हेरिएबल मेसेज साइन बोर्ड आणि कमांड केंट्रोल सेंटरचा समावेश असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.