Pune News: पीओपीच्या मूर्ती पाण्यात विरघळण्यासाठी 150 टन अमोनियम बायकार्बोनेट खरेदी करणार- हेमंत रासने

पुणे शहरात घरगुती आणि सार्वजनिकरित्या साधारणत: 6 लाख गणेशमुर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. त्यात बहुतांशी मुर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असतात.

एमपीसी न्यूज – प्लॉस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती पाण्यात विरघळावी यासाठी पुणे महापालिका 150 टन अमोनियम बायकार्बोनेट खरेदी करणार आहे. त्याला मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकारांना दिली. त्यासाठी 33 लाख 44 हजार रूपये खर्च येणार आहे.

पुणे शहरात घरगुती आणि सार्वजनिकरित्या साधारणत: 6 लाख गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. त्यात बहुतांशी मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असतात. मात्र, या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्या पाण्यात विरघळावेत यासाठी ‘अमोनियम बायकार्बोनेट’ खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़.

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमधील तज्ज्ञांशी विचारविनिमय करून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळानेही मान्यता दिली आहे. स्थायी समितीने 2020-21 च्या अर्थसंकल्पात केलेल्या 72 लाख रूपये तरतुदीचा वापर करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.