Pune : महापालिकेचा निधी बिल्डरांच्या फायद्यासाठी – संजय घुले

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचा निधी बिल्डरांच्या फायद्यासाठी वापरण्यात येत असल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक संजय घुले यांनी केला. महंमदवाडी प्रभाग क्रमांक 26 मधील न्यातीचौक ते कडचौक एनआयबीएम रस्त्यापर्यंत डीपी रस्ते बनविण्याचे काम सुरू आहे.

महापालिकेच्या पथ विभागाचे अभियंता श्रमिक शेवते, अभियंता अविनाश कामठे, अभियंता पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली महंमदवाडी ते एनआयबीएम रोडपर्यंत मुख्य डीपी रस्त्याचे काम सुरू आहे. हा रस्ता ठेकेदार वर्क ऑर्डरप्रमाणे काम करण्याऐवजी आर्थिक मलई कमविण्यासाठी बिल्डरांच्या स्कीमसमोर केला जात असल्याचेही घुले यांनी सांगितले.

महंमदवाडी भागातील रस्ते व्हावेत, यासाठी पुणे महापालिकेकडे प्रस्ताव दिले. त्याला मान्यताही मिळाली. काम सुरू झाले. मात्र, आपण जिथे काम सुचविले होते. तिथे काम न करता बिल्डरांच्या स्कीमजवळ काम करण्यात येत आहे. संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावे, या मागणीसाठी तीव्र आंदोलन करणार असल्याचा स्पष्ट इशाराही संजय घुले (तात्या) यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.