_MPC_DIR_MPU_III

PMC Vaccine Program : 1919 आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली कोरोना प्रतिबंधक लस !

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेसह खासगी रुग्णालयांतील 1919 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

देेशव्यापी लसीकरण मोहीमेच्या पहिल्या टप्प्यात पुणे शहर आणि उपनगरातील महापालिकेच्या आणि खासगी मिळून 15 रुग्णालयात लसीकरण मोहीम सुरू आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार कोथरूड येथील जयाबाई सुतार रुग्णालयात 130 , पुण्यातील कमला नेहरू रूग्णालयात 150, केईएम हॉस्पिटल 140, ससून रुग्णालय 90, पुना हॉस्पिटल 104, राजीव गांधी रुग्णालय 49 , जोशी हॉस्पिटल 132, रूबी हॉल 164, बुधरानी इनलेक्स 50, जहांगिर हॉस्पिटल 80, दिनानाथ मंगेशकर रुग्णालय 390, नोबेल हॉस्पिटल 76, भारती हॉस्पिटल 123, भारती आयुर्वेद 28, विल्लु पुनावाला हॉस्पिटल 58 , सह्याद्री हॉस्पिटल नगर रस्ता 37, सह्याद्री हॉस्पिटल हडपसर 43, सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन 75 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.