PMC Vaccine : दुसऱ्या टप्पा सुरु : 200 पोलीस कर्मचाऱ्यांचे होणार लसीकरण !

एमपीसी न्यूज : कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात फ्रंट लाइन वर्कर्स म्हणून पुणे शहरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र झटत होते. दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ गुरुवारी (दि.11 फेब्रुवारी) 200 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून होणार आहे.

या संदर्भात पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती म्हणाले, पुणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील सर्व हॉस्पिटलला कोरोना प्रतिबंधक लसीचे शीतगृहांमध्ये साठवणूक आणि वितरण केले जात आहे. सीरम, भारत बायोटेक आणि फायजर कंपनीच्या लसीकरणाचे एकूण पाच टप्पे पार पडणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्पा संपला असून आजपासून दुसरा टप्पा सुरू झाला आहे.

यामध्ये फ्रंट लाइन वर्कर्स म्हणजे आरोग्य अधिकारी, पोलीस अधिकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी, आणि प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश आहे. पुणे पोलीस मुख्यालयातील पोलीस रुग्णालयात 200 पोलिस कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.