PMC Waste plant burnt by Nagarsevak : धक्कादायक ! नगरसेवकांनी जाळला कचरा प्रक्रिया प्रकल्प !

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेने आंबेगाव येथे उभारलेला सुक्या कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प काही नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकल्प जाळल्यामुळे जवळपास 4 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. परंतु यामधील दोषी नगरसेवकांची नावे दडपण्याचा केविलवाणा प्रयत्न पुणे महापालिका प्रशासनाकडून केला जात असल्याची संतापजनक बाब पुढे येत आहे.

शहराच्या सर्व दिशेला ज्या त्या प्रभागातील घनकचरा ज्या त्या प्रभागात जिरविण्यासाठी विविध प्रकल्प उभे केले गेले आहेत. त्यामध्ये गांडुळखत, कंपोस्टखत इ. प्रकल्पांचा समावेश आहे. त्यापैकी आंबेगाव पठार येथे आजुबाजुच्या परीसरातील वर्गीकृत सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून प्रकल्प उभा केला होता. परंतु काही नगरसेवकांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकल्प जाळूून टाकल्याची संतापजनक घटली आहे.


या संबंधित नगरसेवकांची व कार्यकर्त्यांची नावे अद्याप उघड झालेली नाहीत. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, एक राष्ट्रवादी काँग्रेसचा विद्यमान नगरसेवक असून अन्य भाजपचा माजी नगरसेवक असल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात विचारणा केली असता महापालिका प्रशासनाकडून या दोषी नगरसेवकांची नावे दडपण्याची धडपड सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.