Pune : स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शुक्रवारी निवडणूक

भाजपतर्फे हेमंत रासने तर महाविकास आघाडीतर्फे महेंद्र पठारे यांना उमेदवारी

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शुक्रवारी (दि. 6 मार्च) सकाळी निवडणूक होणार आहे. भाजपतर्फे हेमंत रासने यांनी तर, राष्ट्रवादी – काँग्रेस – शिवसेना महाविकास आघाडीतर्फे महेंद्र पठारे यांनी सोमवारी अर्ज दाखल केला.

‘पीएमपीएल’च्या नयना गुंडे निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. स्थायी समितीत एकूण 16 सदस्य आहेत. त्यामध्ये भाजपचे 10, राष्ट्रवादी 4 तर, शिवसेना आणि काँगेसचा प्रत्येकी 1 सदस्य आहे. त्यामुळे भाजपचा अध्यक्ष निश्चित मानला जात आहे. अध्यक्षपदासाठी पुन्हा हेमंत रासने यांनाच संधी मिळाली आहे. पुढील अर्थसंकल्प तेच सादर करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like