PMP Atal Yojna : खूषखबर…अटल बस योजना पसंतीस ; 1 कोटी 21 लाखांचे उत्पन्न !

एमपीसी : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) दर 5 मिनिटाला बस अन् 5 किलोमीटरला 5 रुपये तिकीट अशी अटल बस योजना पुणेकरांच्या पसंतीस उतरली आहे. अवघ्या दोन महिन्यात 23 लाखांहून अधिक नागरिकांनी प्रवास करत सुमारे 1 काेटी 21 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे.

‘अटल’ बस सेवेअंतर्गत शहराच्या मध्यभागातील 9 मार्गांवर 99 बसेस संचलना करिता सोडण्यात आल्या होत्या. पीएमपीएमल प्रशासनाने 1 महिन्याचा आढावा घेवून काही मार्गांचा सर्व्हे करून 99 बसेस पैकी 38 बसेस कमी करुन ज्या मार्गांवर प्रवासी संख्या व उत्पन्न जास्त मिळाले आहे. त्या मार्गांवर 18 जास्त बसेस सोडण्यात आल्या आहेत. तसेच सध्या पुणे सिटी कोअर अंतर्गत 9 मार्गांवर 79 बसेस व डेपो ट्रान्झिट अंतर्गत 40 मार्गांवर 107 पैकी 70 बसेस संचलनात आहेत. या बससेवेला प्रवाश्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

या संदर्भात पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, पुणे व पिंपरी चिंचवडकरांनी हा अभिनव उपक्रम स्विकारला. चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रवाशांना चांगली सेवा मिळाली आहे. मिडी बसमुळे तर रस्त्यावरील रहदारी व अपघात यांचे प्रमाण कमी झाले असुन पुणेकर व पिंपरी चिंचवडकर पीएमपीएमएलला असाच चांगला प्रतिसाद देतील अशी मला आशा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.