Pune News : दुचाकी धडकल्याने धावत्या पीएमपी बसला आग, एकचा मृत्यू

0

एमपीसी न्यूज : पुण्याच्या खराडी परिसरात धावत्या पीएमपी बसला मागून आलेल्या दुचाकी चालकाने धडक दिल्याने बस ने आग पकडली. खराडी बायपास चौकातून काही अंतरावर हा प्रकार घडला. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास खराडी बायपास चौकातून पीएमपीएमएलची ही बस जात होती. बस मध्ये काही प्रवासी देखील होते. यावेळी इंजिन मधून अचानक धूर बाहेर पडत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले.

_MPC_DIR_MPU_II

यानंतर चालकाने प्रसंगावधान दाखवत बस रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर पाहता पाहता बस च्या समोरील भागात आगीचा भडका उडाला. या आगीत धडक दिलेला दुचाकी चालकाचा बस खाली अडकून मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like
Leave a comment