Sangvi News : पीएमपी बस चालक, वाहकाला मारहाण

0

एमपीसी न्यूज – रस्त्याचे काम चालू असल्याने एका दुचाकीस्वाराला दुचाकी हळू चालवण्यास सांगितल्यावरून दुचाकीस्वार आणि त्याच्या साथीदाराने मिळून पीएमपी बसचालक आणि वाहकाला मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 16) रात्री साडेसात वाजता विजयनगर, पिंपळे गुरव येथे घडली.

गोपाळ रामदास दातीर (वय 39, रा. चाकण) यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांसुर मोपेड दुचाकीचालक आणि त्याच्या एका साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दातीर हे पीएमपी वाहक म्हणून काम करतात. ते मंगळवारी रात्री भोसरी-भेकराईनगर (बस क्रमांक 148) या बसवर कर्तव्यावर होते. पिंपळे गुरव येथे विजयनगर जवळ रस्त्याचे काम सुरु असल्याने बस चालक दीपक वाघमारे यांनी एका मोपेड दुचाकी चालकाला दुचाकी हळू चालवण्यास सांगितले. त्यावरून दुचाकीस्वार आणि त्याच्या साथीदाराने मिळून बस चालकाला शिवीगाळ करून मारहाण केली.

त्यांचे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी दातीर गेले असता आरोपींनी दातीर यांना देखील हाताने मारहाण केली. याबाबत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment