PMPML: पीएमपी मालामाल, एका दिवसात दोन कोटींची कमाई

एमपीसी न्यूज : पी एम पी एम एल अर्थात पुणे महानगर परिवहन महामंडळ मागील दोन दिवसात मालामाल झाली आहे. सोमवारी एका दिवसात पी एम पी एम एल ने दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. दररोज साधारण दीड कोटी कमाई करणाऱ्या पीएमपीएमएलने हा उच्चंकी आकडा पार केला. यापूर्वी 2016 मध्ये पीएमपीला एका दिवसात दोन कोटी पाच लाखाचे उत्पन्न मिळाले होते. त्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा दोन कोटी रुपये एकाच दिवसात उत्पन्न मिळवण्यात यश आले आहे.

ओमप्रकाश बकोरिया यांची काही दिवसांपूर्वी पी एम पी एल चे व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू केले होते. त्याचे हे यश म्हणावे लागेल. सोमवारी एका दिवसात पीएमपीएमएलच्या 1657 बस पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या मार्गावर धावत होत्या. या बसमधून तब्बल 12 लाख 99 हजार प्रवाशांनी प्रवास केला. यातूनच तब्बल दोन कोटी एक लाख 45 हजार रुपये इतके उत्पन्न एका दिवसात मिळाले आहे.

Murder News : तंबाखूसाठी पैसे न दिल्याने आईचा खून; पुणे जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात बस सेवा पुरवली जाते. यासाठी प्रशासनाकडे 2000 हून अधिक बस आहेत. यामध्ये काही बसेस या पी एम पी एम एल च्या स्वतःच्या आहेत तर काही खाजगी बसेस आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक आणि सीएनजी वर चालणाऱ्या बसेसची संख्या आहे. सोमवारी मिळालेल्या विक्रमी उत्पन्नावरून शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून तसेच नोकरदार वर्गाकडून पीएमपीला प्रवासासाठी प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.