Pune : पीएमपीएल बसने अचानक घेतला पेट; बस जळून खाक (व्हिडीअो)

एमपीसी न्यूज – पीएमपीएल बसने अचानक पेट घेतल्यामुळे बस जळून खाक झाल्याची घटना आज मंगळवारी (दि.30) दुपारी साडेतीनच्या सुमारास शिवाजीनगर येथील संचेती हॉस्पिटलसमोरील पुलावर घडली आहे. ही बस विश्रांतवाडीवरून कोथरूडच्या दिशेने चालली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथील संचेती हॉस्पिटलसमोरील पुलावरून ही पीएमपीएल बस जात असताना बसच्या  इंजिनमधून धूर येत असल्याचे बसचालकाला लक्षात येताच तात्काळ बस बंद करून बसमधील प्रवाशांना उतरण्यास सांगितले व
चालकानेच अग्निशमन दल आणि पोलिसांना ही घटना कळवली. दरम्यान बसने पेट घेतला होता. व त्यातच बस जळून खाक झाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी यंत्राच्या सहाय्याने आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

https://www.youtube.com/watch?v=l7_E_OOnmgw&feature=youtu.be

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.