PMPL : पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील दिव्यांग व दुर्धर आजार ग्रस्त व्यक्तींना मोफत बस प्रवास पासची मुदतवाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगर (PMPL) पालिकेच्या हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना व दुर्धर आजार असलेल्या व्यक्तींना सन 2022-23 या वर्षा करीता पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत मोफत बस प्रवास पास देण्यात आला होता. त्या  बस प्रवास पासची  मुदत दि.31 मार्चला संपत आहे.

 

तथापि पिंपरी चिंचवड मनपाकडून सन 2023-24 पासून सदरची योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्याचे नियोजन असून याबाबतची कार्यवाही होईपर्यंत म्हणजेच दि.28 एप्रिल पर्यंत पिंपरी  चिंचवड महानगर पालिके कडील सन 2022-23 मधील संबंधित पास धारकांना मुदत वाढ देण्यात यावी असे पिंपरी चिंचवड मनपाकडील समाज विकास विभागाने सांगितले आहे.

 

EPFO : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! खात्यात जमा PF वर मिळणार भरमसाठ व्याज, EPFO ची घोषणा

 

त्या अनुषंगाने संबंधित पास धारकांना, दि.28 एप्रिल अखेर पर्यंत पीएमपीएमएल चे बस मधून सन 2022-23 या वर्षा करीताचा जुना पास दाखवून मोफत बस प्रवास (PMPL) करता येईल.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.