Pune : लोकप्रतिनिधींनी पीएमपीएलने प्रवास केल्यास समस्या समजतील

पीएमपीएल जनसंवाद मध्ये प्रवाशांचा महापौरांना सल्ला

एमपीसी न्यूज : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर जर लोकप्रतिनिधींनी केला तर सामान्य प्रवाशांच्या समस्या समजतील त्यासाठी जनसंवाद आयोजनाची गरज काय? असा सवाल प्रवाशांनी महापौर मुक्ता टिळक यांना केला.

शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सर्वात महत्वाचा भाग असणाऱ्या पीएमपीएमएलची सेवा जास्तीत जास्त लोकाभिमुख व्हावी, या उद्देशाने महापौर मुक्ता टिळक यांनी ‘जनसंवाद’ उपक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम घोले रस्त्यावरील पंडितांच्या नेहरू सांस्कृतिक भवनात पार पडला. यावेळी महापौर मुक्ता टिळक, पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, सह-व्यवस्थापकीय संचालक चारटनकर, वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, महापालिका अधिकारी श्रीनिवास बोनाला, नगरसेविका माधुरी सहस्रबुध्दे, मंजुश्री खर्डेकर, ज्योत्स्ना एकबोटे, नीलिमा खाडे, गायत्री खडके आदी उपस्थित होते.

‘पीएमपी’चे सक्षमीकरण होण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक समस्यांचा पाढा नागरिकांनी वाचला जुन्या गाड्या, ब्रेकडाऊनचे वाढलेले प्रमाण, बीआरटी बसचे नादुरुस्त दरवाजे, मार्गावर बसेसची कमतरता आदी प्रश्नांना प्रवाश्यानी वाचा फोडली तसेच बसेसची संख्या कमी असल्याने नवीन मार्गवर बस सूर करण्यात येऊ नये,  पास व तिकीट मराठी बरोबर इंग्लिश मध्ये द्यावेत, डिझेल बस खरेदी करू नये, शहरात ऑड इव्हन वाहतूक व्यवस्था सुरु करावी, समस्यांच्या निराकरणासाठी अभ्यास समिती स्थापन करावी, सीएसआर वापर करून बस स्टॉप विकसित करावेत, बस फलक डिजिटल कराव्यात, बस बांधणीसाठी एसटीची मदत घ्यावी. पेठ परिसरा छोट्या गाड्या सोडाव्यात, तुकाराम मुंढे सारख्या अधिकाऱ्याला कार्यकाळ पूर्ण करु द्याव आणि राजकीय पुनर्वसनासाठी संचालक मंडळात वर्णी नको अशा प्रकारच्या सूचना नागरिकांना कडून करण्यात आल्या. तसेच भाजपने जाहीरनाम्यात दिलेल्या मोफत बस प्रवासाची आश्वासनाही पूर्तता केल्यास समस्या सुटण्यास मदत होईल अशी सूचना करत महापौरांना जाहीरनामाची आठवण करून देण्यात अाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.