Pune : पुण्यात पुन्हा संतोष माने होता-होता राहिला

एमपीसी न्यूज – कात्रज वरून जवळपास 40 प्रवाशांनी भरलेली  बस क्रमांक एमएच 14 सीडब्ल्यू 1672 या कोथरूड डेपोच्या बसचा अपघात होता होता राहिला. त्यामुळे पुन्हा एकदा संतोष माने होता होता राहिला.

गाडी कात्रज वरून निघाल्यानंतर गाडीचा ड्रायव्हर चंद्रशेखर अहिरे गाडी चालवताना झोपत होता. काही प्रवाशांच्या हे लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी पद्मावती जवळ बस थांबवून त्याला जाब विचारला. त्यानंतर अहिरे दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. प्रवाशांच्या तक्रारीला त्वरित प्रतिसाद देत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल दरेकर घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी दारूच्या नशेत असणाऱ्या चंद्रशेखर अहिरेला ताब्यात घेतले.

या सदर प्रकरणामुळे पीएमपील ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. यापूर्वी देखील असे अनेक प्रकार घडले आहेत . मात्र, पीएमपील प्रवाशांच्या जीवाशी खेळत असते. डेपोमधून गाडी सोडताना आता वाहक आणि चालकाची सुद्धा तपासणी करावी अशी मागणी प्रवाशी करत आहेत.

दरम्यान ,याप्रकरणाची गंभीर दखल प्रशासनाकडून घेतली गेली आहे. सदर मद्यधुंद चालकाची पीएमपीने हकालपट्टी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.