Dighi : पीएमपीएमएल बसची दुचाकीला धडक; जमावाकडून बसवर दगडफेक

एमपीसी न्यूज – दिघीहून भोसरीगाव कडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसने (एम एच 12 / एच बी 0716) एका दुचाकीला धडक दिली. यावरून संतप्त जमावाने पीएमपीएमएल बसवर दगडफेक केली. यामुळे दिघी भोसरी मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. ही घटना आज (मंगळवारी) रात्री दिघी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघीहून भोसरीकडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसने (एम एच 12 / एच बी 0716) एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला आहे. तसेच त्याच्या दुचाकीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा प्रकार रस्त्याच्या मधोमध झाला. त्यामुळे दिघी-भोसरी मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. दिघी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिघीकडून भोसरीकडे जाणारी वाहतूक वळवली आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्न करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.