Bhosari : पीएमपीएमएल बस प्रवासात 60 हजारांची सोन्याची पाटली लांबवली

एमपीसी न्यूज – भोसरी येथे बस थांब्यावर बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या हातातील दीड तोळ्याच्या 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची पाटली चोरली. ही घटना बुधवारी दुपारी चार वाजता भोसरी येथे घडली.

रेखा मच्छिंद्र केदारी (वय 64, रा. भीमनगर, पिंपरी वाघेरे) यांनी बुधवारी (दि. 4) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेखा या बुधवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भोसरी बस थांब्यावरून पीएमपीएमएल बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी त्यांच्या हातातील दीड तोळे वजनाची 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची पाटली चोरून नेली. भोसरी तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.